दारूचा गुत्ता बंद होईपर्यंत मतदानावर बहिष्कार, गौरी घुमट परिसरात नागरिक आक्रमक

शेअर करा

नगर शहरातील गौरी घुमट परिसरात एका व्यक्तीने सुरुवातीला छोटेखानी हॉटेल सुरू केले मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याकारणाने हळूहळू तिथे दारू सिगारेट सुरू झाली त्यानंतर आता चक्क क्रिकेटचे बॅटिंग देखील होत असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करत आहेत. कोतवाली पोलिसात वेळोवेळी फिर्याद दिल्यावर केवळ जुजबी कारवाई करण्यात येते आणि पोलिसांना हाती काहीही लागत नाही असे आतापर्यंत दिसून आलेले आहे. 

गौरी घुमट परिसर हा नगर शहरातील मध्यवर्ती भागात असून अनेक कुटुंबे इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत . महिला आणि मुली यांना या मद्यपी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि त्यांना काही विचारले तर भांडणाचे प्रसंग ओढवतात. सावरकर उद्यानात अनेकदा हे मद्यपी व्यक्ती येऊन बसतात त्यामुळे महिला आणि मुलींना देखील तिथे जाण्याचे धाडस होत नाही. गुटखा खाऊन तिथे पिचकारी मारल्या जातात त्यामुळे हे उद्यान महिला आणि मुलांसाठी राहिलेलेच नाही अशी परिस्थिती झालेली आहे. 

आतापर्यंत सुमारे आठ ते दहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत मात्र केवळ जुजबी कारवाई केली जाते आणि दोन दिवसात पुन्हा तेच हॉटेल उघडून तसेच प्रकार पुन्हा सुरू होतात. तक्रारदार व्यक्ती यांना यापूर्वी अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत . दारूच्या गुत्त्यावर कठोर कारवाई करून ते बंद करावे अन्यथा मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल असा स्पष्ट इशारा परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे . परिसरातील रहिवासी असलेले सुरज नामदे हे गेल्या काही वर्षांपासून हा दारूचा गुत्ता बंद व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.


शेअर करा