उत्कर्षाताई रुपवते वंचितमध्ये दाखल , लोकसभा लढवण्यावर अखेर शिक्कामोर्तब 

शेअर करा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उत्कर्षाताई रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीत काल प्रवेश केलेला असून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोला येथील यशवंत भवन इथे हा प्रवेश सोहळा पार पाडला. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उत्कर्षाताई रुपवते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय हा आता केवळ एक औपचारिकता राहिलेला असून विक्रमी वेळेत मतदार संघात प्रचाराचे आव्हान उत्कर्षाताई यांच्यासमोर आहे. 

काँग्रेस पक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उत्कर्षाताई रूपवते आता लोकसभा लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्कर्षाताई रूपवते या काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होत्या मात्र शिर्डीत वातावरण बदलल्यानंतर त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे. 

उत्कर्षाताई रूपवते यांनी एक प्रसिद्धी पत्रक दिलेले असून त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी राजीनामा पाठवलेला आहे अशी माहिती देत प्रसिद्धी पत्रकात  काँग्रेस पक्षाकडून विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानलेले आहेत. गेल्या सोळा वर्षापासून पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि कष्टाने मेहनतीने काम केले . राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली आणि आपण प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडली ‘ असे म्हटले आहे . 

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की , ‘ रूपवते – चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याविषयी पक्ष नेतृत्वाने विचार करावा असे विनम्रपणे नमूद करते ‘ असे म्हटलेले आहे .


शेअर करा