मोठी बातमी..उत्कर्षाताई रूपवते यांना ‘ ह्या ‘ पक्षाचे तिकीट जाहीर , लढत तिरंगी होणार

शेअर करा

उत्कर्षाताई रूपवते

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ब्रेकिंग न्यूज आलेली असून उत्कर्षाताई रूपवते यांचे वंचित बहुजन आघाडीचे तिकीट अखेर कन्फर्म झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून दोन नावांची घोषणा आज करण्यात आलेली असून त्यामध्ये सातारा मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून प्रशांत रघुनाथ कदम तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रूपवते यांचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी मारुती धोंडीराम जानकर यांचे नाव जाहीर करण्यात आलेले होते मात्र जानकर यांनी कौटुंबिक कारणास्तव माघार घेतल्यानंतर प्रशांत रघुनाथ कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अखेर उत्कर्षाताई रूपवते यांना पक्षाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलेले आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असून काँग्रेस पक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उत्कर्षाताई रूपवते आता वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्कर्षाताई रूपवते या काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होत्या मात्र शिर्डीत वातावरण बदलल्यानंतर त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस आता शिल्लक राहिलेले असून इतक्या कमी कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचून विकासाची काहीतरी ब्लू प्रिंट उत्कर्षाताई रूपवते यांना मतदारांसमोर द्यावी लागेल. दुसरीकडे सद्य परिस्थितीत खासदार आणि आमदार असलेले सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांचा देखील या मतदारसंघावर मोठा पगडा आहे.   महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांवर मतदार नाराज असले तरी उत्कर्षाताई रुपवते यांच्यासाठी ही लढाई जिकिरीची ठरणार आहे.

सदाशिव लोखंडे हे फक्त निवडणुकीपुरतेच मतदार संघात सक्रिय असतात त्यानंतर नॉट रीचेबल होतात असे आरोप अनेकदा त्यांच्यावर सातत्याने केले जातात तर दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याही विकास कामांवर शिर्डीकर फारसे खुश नाहीत अशा परिस्थितीत उत्कर्षाताई रुपवते यांच्या माध्यमातून शिर्डीकरांना नेतृत्वासाठी एक नवीन पर्याय मिळू शकेल. 


शेअर करा