वैभव नायकोडी खून प्रकरणात एकाला अटक , तोफखाना पोलिसांची कामगिरी

नगर शहरात एका शिक्षिकेचा वारंवार पाठलाग करून
शेअर करा

नगर शहरात गाजलेल्या तपोवन रोड येथील वैभव नायकोडी या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी नऊ आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. 

तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल बंडू पाटोळे ( वय 19 वर्ष राहणार चेतना कॉलनी एमआयडीसी ) याला पोलिसांनी अटक केलेली असून तो एमआयडीसी परिसरातील जिमखाना येथे येणार असल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेली होती त्यानुसार कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

वैभव नायकोडी नावाच्या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करून त्यानंतर मृतदेह जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीला आलेला होता. नगर शहरात गेल्या काही महिन्यात कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याची देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे. 


शेअर करा