68 वर्षीय राजाच्या प्रेयसीचे ‘ तसले ‘ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अख्ख्या देशात खळबळ

शेअर करा

सेलिब्रिटींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही मात्र चक्क एखाद्या राजाच्या प्रेयसीचे तसले फोटो व्हायरल होणे म्हणजे दुरापास्तच, मात्र आता चक्क थायलंडचे राजे महा वजिरालोंगकॉर्न यांच्या प्रेयसीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. महा वजिरालोंगकॉर्न यांची प्रेयसी सीनित वोंगवजिरापकडी हिचे हे फोटो आहेत. जवळपास एक हजारपेक्षा अधिक फोटो अज्ञात व्यक्तीने लिक केले आहेत.

उपलब्ध वृत्तानुसार, सीनित वोंगवजिरापकडी हिच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बहुतांश फोटो न्यूड आहेत. थायलंडचे राजे महा वजिरालोंगकॉर्न आणि पत्नी सुथिडा व प्रेयसी सीनित यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. याच वादातून हे फोटो सोशल मीडियावर लिक करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

राजे महा वजिरालोंगकॉर्न यांनी गेल्या वर्षी आपल्या प्रेयसीला तुरुंगात टाकले होते. राणी सुथिडा हिची छबी खराब केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. मात्र नुकतीच सीनित हिची तुरुंगातून सुटका झाली असून ती पुन्हा राजाच्या जवळ आली आहे. या दरम्यानच हे फोटो लिक करण्यात आले आहेत. त्यामुळे यामागे काहीतरी षडयंत्र असल्याची चर्चा थायलंडमध्ये सुरू आहे तर याकडे रिव्हेंज पॉर्न म्हणून देखील पाहिले जात आहे.

याबाबत ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, राजे महा वजिरालोंगकॉर्न यांची प्रेयसी सीनित हिचे न्यूड फोटो थायलंडच्या राजेशाहीविरुद्ध प्रदर्शन करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांनाही पाठवण्यात आले आहेत. हे सर्व फोटो 2012 ते 2014 दरम्यान काढण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो खुद्द सीनित हिनेच क्लिक करून घेतले होते, अशी देखील माहिती उपलब्ध झालेली आहे.


शेअर करा