कंगनाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोरदार राडा,लोक म्हणाले ‘ निघ इथून..’

शेअर करा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मूर्खपणाला काही सीमा उरलेली नाही मात्र भाजपचे समर्थन करत असल्याने काही वर्ग तिचा चाहता देखील आहे . कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या.

शेतकरी आंदोलनावर टीका केल्यापासून कंगणा सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या देखील निशाण्यावर आहे . आंदोलकांनी कंगनाला,’ कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे ‘ असा इशारा देत आंदोलन केले मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आले. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहेत.

कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे. कंगनाच भाजप समर्थन पाहता भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात तसेच इतर भाजप शासित राज्यात हा चित्रपट करमुक्त केला जाऊ शकतो .

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020 ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्याचे स्वत : कंगनाने सांगितले होते आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे.


शेअर करा