आंघोळ करताना ‘ ह्या ’ गोष्टी लक्षात ठेवा, दिवसभर रहाल फ्रेश

शेअर करा

नियमित आंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज आंघोळ केल्याने आपले शरीर शुद्ध होतेच, परंतु यामुळे आपल्याला त्वचेला तजेलाही मिळतो. परंतु, आंघोळ करताना पाण्यात काही गोष्टी मिसळल्या तर त्या तुमच्या त्वचेला आणि आरोग्याला चांगला फायदा देतात आणि तुमचा थकवाही कमी करतात. चला तर जाणून घेऊया पाण्याबरोबर कोणत्या गोष्टी मिसळून आंघोळ केल्याने तुम्हाला अधिक स्फूर्ति मिळेल आणि तुमचा दिवस उत्तम बनेल.

  • गुलाब पाणी
  • आंघोळीच्या पाण्यात गुलाबाचे पाणी मिसळल्याने शरीर ताजेतवाने होते. त्याचबरोबर गुलाब पाणी आपल्या शरीरातून घामाचा दुर्गंध देखील दूर करते. जर, तुम्हाला चमकदार आणि नितळ त्वचा हवी असेल, तर अंघोळीच्या पाण्यात गुलाबाचे पाणी घालणे खूप फायदेशीर ठरेल.
  • बेकिंग सोडा
  • आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडाचा वापर केल्याने शरीरातील टॉक्सिक घटक दूर होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात चार चमचे बेकिंग सोडा टाकून स्नान करावे. यामुळे आपला थकवा देखील दूर होईल.
  • कडुलिंबाची पाने
  • पाण्यात कडूलिंबाची पाने मिसळून आंघोळ केली, तर तुम्हाला तजेला येईल. हे पाणी थकवा दूर करण्याबरोबरच आपल्या त्वचेसंदर्भातील समस्या दूर करण्यात देखील हे प्रभावी आहे. म्हणून, आंघोळ करताना किमान 8 ते 10 पाने पाण्यात उकळा आणि हे पाणी गाळून त्याने अंघोळ करा. यामुळे तुमच्या शरीराची सूज देखील कमी होते.
  • तुरटी व सैंधव मीठ
  • तुरटी व सैंधव मीठ या दोन गोष्टींमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत, परंतु बर्‍याच लोकांना याबद्दल माहिती नाही. जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी आणि थोडीसे सैंधव मीठ मिसळले तर ते तुमच्या शरीरातील थकवा देखील दूर करते आणि तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत ठेवते. या व्यतिरिक्त, हे आपल्या स्नायूंमध्ये वेदना दूर करण्यात देखील उपयुक्त आहे.
  • कापूर
  • आंघोळीच्या पाण्यात कापूर घाला आणि या पाण्याने स्नान करा. याचा तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासाठी कापूरचे 2 ते 3 तुकडे आंघोळीच्या पाण्यात मिसळा. यामुळे शरीर आणि डोकेदुखी देखील कमी होते.

शेअर करा