१५ जूनपासून देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन ? : सरकारचे काय उत्तर

शेअर करा

देशात पहिल्यांदा उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 276583 लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. 7745 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 135205 लोक कोरोना व्हायरसपासून बरे देखील झालेले आहेत . सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करत आहे मात्र नागरिकांच्या मनात अजून देखील संशयाचे वातावरण आहे. १५ जूनपासून देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरु होणार असल्याचे मेसेज देखील सोशल मीडियावर फिरत आहेत .

देशातील रुग्णांचा आकडा तीन लाखांकडे वाटचाल करत असताना पुन्हा येत्या 15 जूनपासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज फिरत व्हायरल होत असून ह्या मेसेजने आधीच धास्तावलेल्या नागरिकांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण तयार झाले आहे . सदर व्हायरल मेसेजमध्ये केलेल्या दाव्य़ानुसार 15 जूनपासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच गृह मंत्रालयानेही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. रेल्वे सेवेसह विमान सेवाही बंद करण्यात येणार असल्याचे यामध्ये म्हटले होते.

मात्र सरकारची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीमे फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृह मंत्रालयाकडून ट्रेन आणि विमानांवर बंदीसह देशभरात 15 जूनपासून लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे. खोट्या बातम्या पसरू नयेत यासाठी आता केंद्र सरकारने कंबर कसली असून पीआयबी फॅक्ट चेक च्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती देण्यात आली आहे .


शेअर करा