फक्त बहाणे बनवले.. देशाला उपचाराची गरज आहे, प्रचाराची नाही : मोदींवर कोणी साधला निशाणा ?

शेअर करा

करोनामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण खाली असून लॉकडाउन शिथिल केल्यानंतर करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयानंही चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे देशात निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवरून काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाला उपचाराची गरज आहे, प्रचाराची नाही, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

देशात करोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक याचिका दाखल करून घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी वेळी न्यायालयानं चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर संबंधित राज्यांना देखील याबद्दल नोटीस बजावली आहे .

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विट करून केंद्रावर निशाणा साधला आहे, आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला आहे. सरकारनं आपलं अपयश झाकण्यासाठी नोटबंदीच्या काळात दररोज उद्देश बदलले होते. लॉकडाउनच्या काळात सरकारनं त्यापेक्षाही अधिक बहाने बनवले. टेस्टिंग केल्या नाही. उपचार नाही. फक्त नारे. देशाला उपचार हवे आहेत, प्रचार नाही,”

करोना संदर्भात मोदी यांनी केलेल्या गोलगप्पांवर राहुल गांधी यांनी देखील याआधी अनेक वेळा टीका केली आहे . फेब्रुवारी महिन्यातच राहुल गांधी यांनी केंद्राला कोरोनाच्या परिस्थितीबद्दल सावधान केले होते मात्र मध्य प्रदेशातील सत्ता उलथवण्याच्या नादात केंद्राने ह्या अलर्ट कडे साफ दुर्लक्ष केले होते .

अजूनदेखील केंद्राकडून रोज नवीन घोषणा फक्त होत असून कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. देशात १ लाख लोकांमागे केवळ ३५२ लोकांची टेस्ट करून तेच कमी आकडे मीडियात फिरवले जात आहेत मात्र टेस्टची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नसल्याचे चित्र आहे . विरोधी पक्ष सत्तेत नसताना विरोधी पक्षाने काय केले ? असे प्रश्न विचारून भाजप आपले हसे करून घेत आहे .


शेअर करा