सुशांत सिंह राजपूतच्या घरातून आणखी एक दुर्दैवी बातमी : नक्की काय घडलय ?

शेअर करा

पवित्र रिश्ता मधून घराघरात पोहचलेलय सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी अद्याप देखील खरी वाटत नाही अशी सुशांतच्या चाहत्यांची व नातलगांची परिस्थिती आहे. सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात सुशांतचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तसेच आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील डिटेल्सनुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे..

दुसरीकडे बिहारमधील पूर्णिया इथे राहत असलेल्या सुशांतच्या चुलत भावाच्या पत्नीला देखील सुशांतच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसला होता तर सुशांतच्या वडिलांची देखील तब्येत खालावली होती. मात्र सुशांतची वाहिनी असलेल्या सुधा देवी हा अकस्मात धक्का पचवू शकल्या नाहीत. सुशांतवर अंत्यसंस्कार केले जात असताना त्यांचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . सुशांतचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी अन्न पाणी सोडले होते,जेव्हा सुशांतवर अंत्यसंस्कार होत असताना काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला.

सुधा देवी काही काळापासून आजारी होत्या मात्र सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली.डॉक्टरांना बोलावून औषधोपचार करण्यात आले मात्र त्याने फरक पडला नाही . शुद्धीवर आल्यावर ‘ सुशांत कसा आहे? इतकेच बोलून त्या पुन्हा बेशुद्ध होत होत्या. घरासमोर जमलेली गर्दी पाहून त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला होता .

सुधा देवीचे पती आणि सुशांतचे चुलत भाऊ अमरेंद्र सिंग म्हणतात,आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नी, कोणासाठी जिवंत राहू ? अशा शब्दात मनातील दु:ख त्यांनी व्यक्त केले.


शेअर करा