लग्नाच्या भूलथापा देऊन लॉजमध्ये अत्याचार तसेच चार वेळा गर्भपात केल्याचा पोलिसावर आरोप : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

सुरुवातीला प्रेम केले मग लग्नाच्या भूलथापा दिल्या. पीडित महिलेचा त्याच्यावर आंधळा विश्वास असल्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध देखील ठेवले मात्र लग्नाची वेळ येताच त्याने तोंड फिरवले त्यातून वादाला सुरुवात झाली . लग्नाच्या भूलथापा देऊन महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कोल्हापूर येथील शीघ्र कृती दलात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलवर करण्यात आला आहे .

पडवळवाडी, ता. करवीर येथील हा कॉन्स्टेबल असून निलेश ( वय ३५ ) असे त्याचे नाव आहे. लग्नाच्या भूलथापा देऊन महिलेचे लैंगिक शोषण करण्यासह तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल ह्या कॉन्स्टेबलवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल निलेश हा शीघ्र कृती दलात कार्यरत असून त्याने लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवले मात्र लग्नाची वेळ येताच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा देखील आरोप पीडित महिलेने केला आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल निलेश याने पीडित महिलेसोबत सुरुवातीला ओळख वाढवली. त्यानंतर तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. कोल्हापूरसह पन्हाळा येथील लॉजवर नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले, पुढे त्यातून गर्भधारणा देखील झाली मात्र त्याने चार वेळा गर्भपात करण्यास ह्या महिलेला भाग पडले, असे ह्या महिलेचे आरोप आहेत .

पीडित महिला खासगी कंपनीत नोकरी करत असून घटस्फोटीत असल्याने असहाय्यतेचा फायदा घेतल्याचा आरोप तिने कॉन्स्टेबल निलेश याच्यावर केला आहे. दरम्यान, निलेश याची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास तातडीने त्याच्यावर अटकेची व निलंबनाची कारवाई होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.


शेअर करा