पुण्यातील कोरोना रुग्णालयातून महिला झाली होती बेपत्ता, आली ‘ खळबळजनक ‘ बातमी

शेअर करा

पुण्यात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळला. ही महिला भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमधून बेपत्ता झाली होती. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र आज हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या महिलेचा मृतदेह मिळून आला. बायमाबी कमरुद्दीन तांबोळी असं मृत महिलेचं नावं आहे.

सदर महिला हॉस्पिटलमधून बेपत्ता होतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. खाजगी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह महिला पळून जातेचं कशी? हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत तसेच रुग्णाला रुग्णालयातून पळून जाण्याचीच इच्छा का होते ? रुग्णालय प्रशासन रुग्णाची काळजी घेत नसल्याने तर असे प्रकार होत नाहीत हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे .

नेमकं प्रकरण काय ?

बायमाबी तांबोळी या महिलेला कोरोनाची लक्षणे होती. त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर पुण्यातील भवानी पेठेतील होप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसापूर्वी त्या अचानक रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. उपचार सुरु असताना बायमाबी तांबोळी नेमक्या कुठे गेल्या, याचा पत्ता कुणालाच नव्हता. शेवटी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली. मात्र बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनी म्हणजे आज त्यांचा थेट मृतदेहच आढळला.

बायमाबी तांबोळी बेपत्ता झाल्यानंतर रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये बायमाबी या धडपडत चालताना दिसत आहेत. चाचपडत चालताना त्यांनी बाजूला असलेल्या गाडीला हात लावून तोल सांभाळला. त्यानंतर पुढे जाऊन त्या जागेवरच बसल्याचे सीसीटीव्ही मध्ये आढळून आले होते. बायमाबी या अचानक खाली बसल्याने बाजूला असलेल्या व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी धावतो. तो त्यांना आधार देऊन रस्ता क्रॉस करण्यास मदत करतो. बायमाबी या त्या व्यक्तीचा आधार घेऊन चालत जातात आणि रस्ता क्रॉस करतात.


शेअर करा