कोरोना लस घेताना ह्या मराठी अभिनेत्रीचे नखरे पाहून लोकांच्या ‘ भन्नाट ‘ कमेंट आणि व्हिडीओ

शेअर करा

सध्या देशभरात कोरोना लसीकरण सुरू आहे. अनेक जन लस घेत आहेत, तसेच लस घेण्याचं आव्हानही करत आहेत. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ ने ही लस घेतली आहे. लस घेतानाचा तिने व्हिडीओ देखील शूट केला आहे मात्र लस घेताना तिने अनेक प्रकारचे हावभाव केले हे पाहून चाहत्यांनाही भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.

हिना ही दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण बिग ब़ॉस मराठीतील तिच्या आगमनानंतर तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ‘माणूस एक माती’, ‘जस्ट गम्मत’, ‘काय झालं कळना’ अशा मोजक्या मराठी चित्रपटांत ती दिसली होती. हिना ने तिच्या कोरोना लसीकरणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती लस घेताना थोडी घाबरली आहे. तर अनेक हावभाव ही करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. एकाने लिहिलं, ‘बिग बॉस मध्ये टॅटू काढताना नाही दुखलं का?’ तर काहींनी लिहिलं, ‘ओव्हरऍक्टिंगचे पैसे कापा.’

हिना ही तिच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिची चांगली फॅनफॉलोइंग देखिल आहे. बिग बॉस मधील तिचे एपिससोड्स विशेष रंगले होते. एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. हिनाने नुकतेच काही बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले होते. हिनाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला होता.


शेअर करा