.. म्हणून कोरोना होऊन गेल्यास लगेचच लस देत नाहीत , कारण घ्या जाणून ?

शेअर करा

देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र लसीकरणाबाबत अनेक गैरसमज अजूनही आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांनी लस घेऊ नये, याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. तर यामागची कारणं काय आहेत आणि कोरोना झालेल्या रुग्णाला जर लस दिली, तर त्याचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात हे पण समजून घेऊयात.

जर तुम्ही लस घेतलेली नाही आणि कोरोनाची लागण झाली असल्यास कमीत कमी 90 दिवस म्हणजेच तीन महिने तुम्ही लस घेऊ नये. तर,वायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांनी 6 महिने लस न घेण्याचा सल्ला दिलाय. यासाठी त्यांनी युकेतील डेटाचा हवाला दिला आहे.

या डेटानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज विषाणूपासून तुमचा 80 टक्के बचाव करतात. त्यामुळे बरे झाल्यानंतर 6 महिने लस घेऊ नये. तसेच आकडेवारीची तुलना केल्यानंतर WHO ने ही हाच सल्ला दिलाय. कर्नाटकचे कोरोनाच्या जेनेटिक कन्फर्मेशनचे नोडल अधिकारी डॉ. रवी म्हणाले, की पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यानंतर 8 आठवड्यांनी तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता.

तुम्हाला कोरोना झाला असेल तर तुमचे शरीर त्या विषाणू विरोधात लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार करतं. मात्र तुम्ही लस घेतल्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज प्रभावीरित्या काम करत नाही. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्ट दुसरा डोस घेण्यासाठी किमान 8 आठवड्यांचं अंतर ठेवण्यास सांगतात. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास काहींना सौम्य तर काहींना गंभीर लक्षणं जाणवतात.

पहिला डोस घेतल्याच्या तीन आठवड्यात कोरोना झाल्यास लस तेवढी प्रभावी ठरणार ना्ही. मात्र त्यानंतर झाल्यास कोरोनाची लक्षणं सौम्य जाणवतील. संशोधक सध्या नैसर्गिकरित्या आणि लसीपासून मिळणाऱ्या इम्युनिटीबद्दल शोध घेत आहेत. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार व्हायला दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या दरम्यानच्या कालावधीत संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला आतापर्यंत कोरोना झालेला नाही आणि पहिला डोस घेतला आहे. मात्र दुसरा डोस मिळत नाहीए. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नसून लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस घ्यावा, असं महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशींनी सांगितलं आहे.

जगभरात तयार झालेल्या सर्व कोरोना लसींवर अभ्यास सुरू आहे. मेडीकल जर्नल द लॅसेंटमधील एका अभ्यासानुसार, कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये 12 आठवड्याचं अंतर असल्यास त्याचे 81.3 टक्के परिणाम दिसून येतात. तर, 6 पेक्षा कमी आठवड्यांचं अंतर राहील्यास त्याचा परिणाम केवळ 55.1 टक्के होतो. प्रोफेसर रवि म्हणाले, की दोन डोसमध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढी जास्त ती प्रभावी ठरेल.

तु्म्हाला प्रश्न पडत असेल की एक डोस कोव्हॅक्सिनचा घेतला आणि दुसरा कोव्हिशिल्डचा घेतल्यास काय होईल. तर एक्स्पर्ट म्हणतात की याबद्दल पर्याप्त संशोधन अद्याप झाले नसल्यानं माहिती उपलब्ध नाही. तर सीडीसीने सांगितलंय की, लसीच्या डोसमध्ये अदला-बदल करू नये. पहिला डोस घेतलेली लस दुसऱ्या डोससाठी न मिळाल्यास 6 आठवडे वाट पाहावी. कारण जर दोन्ही डोस एकाच लसीचे असतील तर शरीरावर जास्त प्रभावी ठरते.


शेअर करा