दुसऱ्यासोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पत्नीसमोर भर बाजारात चाकू घेऊन तिचा पहिला पती, पुढे काय झाले ?

शेअर करा

प्रेमात जोवर दोन्ही बाजूनी एकमेकांवर विश्वास आहे तोवर ठीक आहे मात्र एकदा की विश्वासाला तडा गेला की पुढे घटस्फोट, भांडणे आणि त्याहून काहीही भयानक होऊ शकते. अशीच एक घटना गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील दौलतपाडा जीआयडीसी परिसरात सोमवारी संध्याकाळी घडली. भावना नामक महिलेचा तिचा आधीच्या पतीने असलेल्या संजय नावाच्या व्यक्तीने भर बाजारात चाकूने भोसकून खून केला. तब्बल १० वेळा त्याने तिच्या पोटात चाकू खुपसला, यात तिचा जागीच मृत्यू झाला. भावना सोनू गोस्वामी असे हया महिलेचे नाव आहे.

खून करणारा संजय आणि भावना यांची २०१२-१३ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केले. काही काळ सोबत राहिल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले पुढे दीड वर्षापूर्वी भावनाने त्याला घटस्फोट दिला आणि ती बागसरामध्ये आपल्या पालकांकडे राहायला आली. ती तिचा भूतकाळ विसरण्याचा प्रयन्त करत होती तर संजयची अद्याप देखील तिने परत यावे अशी इच्छा होती .

दरम्यान, सोशल मीडियावरून भावनाची सोनू गोस्वामी नामक दुसऱ्या युवकाशी ओळख झाली. ही ओळख पुढे प्रेमात रुपांतरीत झाली आणि दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले. भावना आणि सोनू आता दोघेही जुनागढमध्ये राहायला आले. भावना आणि सोनू दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे पूर्वीचा पती संजयला समजले. त्यामुळे संजय प्रचंड संतापला. तो फोन करून भावनाला त्रास देऊ लागला मात्र भावना आता तिच्या नवीन आयुष्यात सुखी होती त्यामुळे ती त्याला टाळत होती.

संजयला ही गोष्ट सहन होत नसल्याने त्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी संजय जुनागढमध्ये आला. त्याने भावनावर चोरून पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अशातच भावना भाजीबाजारात चाललेली असताना संजय अचानक तिच्यासमोर आला आणि त्याने तिची वाट अडवली.

माझ्यासोबत चल असे तो भावनाला म्हणाला. मात्र, तिने त्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाल्याने संतापाच्या भरात संजयने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तब्बल १० वेळा त्याने तिच्या पोटात चाकू खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात ती रस्त्यावर पडली होती त्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्यावर देखील संजय तिच्या मृतदेहाजवळ तो बसून राहिला. पोलीस येताच संजय स्वतःहून त्याच्या हाती स्वाधीन झाला.


शेअर करा