पुणे हादरले..म्हणून ‘ चक्क ‘ स्वतःच्या बायकोला भोंदूबाबाकडे घेऊन गेला अन म्हणाला ..

पुण्यातील एका भोंदूबाबाच्या सांगण्यावरून वंशाचा दिवा मिळवण्यासाठी महिलेला नग्न करून तिच्या अंगाला अंगारा फासल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यापेक्षाही घृणास्पद प्रकार पुन्हा पुण्यात उघडकीस आला आहे . विवाहित महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्यानं पुण्यातील एका भोंदूबाबानं पीडितेसोबत लैंगिक चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी भोंदूबाबाच्या विरोधात पोलिसांत जादूटोणाच्या कलमासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून विशेष म्हणजे महिलेच्या पतीनेच तिला या भोंदूबाबाच्या हवाली केले होते त्यानंतर त्याने तिच्यासोबत असा घृणास्पद प्रकार केला.

पीडितेनं तक्रारीत म्हटल्यानुसार, आरोपी पती मागील काही दिवसांपासून पीडित महिलेच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक अत्याचार करत होता. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी पतीने चक्क पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला आणि उपचारासाठी तिला एका भोंदूबाबाकडे नेलं.भोंदूबाबानं उपचाराच्या नावाखाली विवाहित महिलेसोबत लैंगिक चाळे करून तिचा विनयभंग केला. संबंधित घृणास्पद प्रकार 14 एप्रिल ते 7 मे 2021 पर्यंत जवळपास तीन महिने सुरू होता.

सदर प्रकार पतीच्या कानी घातल्यानंतर पतीने देखील याकडे दुर्लक्ष केले अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 24 वर्षीय विवाहितेनं पोलिसांत फिर्याद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबासह पती आणि सासरच्या अन्य मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असीफ बाबा असं 70 वर्षीय आरोपी भोंदूबाबाचं नाव असून तो पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी आहे.सर्व आरोपी मागील काही महिन्यांपासून फिर्यादी महिलेला वेड ठरवून तिचा छळ करत होते. याप्रकरणी पोलीस सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.