महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ त्या ‘ हत्याकांडात आईच निघाली वैरीण, काय होते कारण ?

शेअर करा

आईसारखे पवित्र दुसरे नाते नाही असे म्हटले जाते, मात्र जालना जिल्ह्यात याच्या उलट घटना उघडकीस आली आहे .प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा आईने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री जालना जिल्हयात उघडकीस आली आहे. पोलिसांना रात्री घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिला त्याच्यामुळे आपल्या प्रियकराला भेटण्यास अडचणी होत होत्या, त्यामुळे तिने प्रियकराची मदत घेऊन पोटच्या मुलाला संपवल्याची प्राथमिक माहिती आहे .

उपलब्ध वृत्तानुसार , अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे (वय २२) या विवाहित महिलेच्या जावेला अंबड येथे एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते तिला भेटण्याच्या निमित्ताने शीतल तिथे आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत पोहचली. जावेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने शीतल उघडे ही रूग्णालयाच्या बाहेर पडली खरी मात्र तिने मुलाला आपल्यासोबत न नेता कुठेतरी थांबवण्याचे निमित्त करून या मुलाला तिथे एका व्यक्तीच्या हवाली केले.

परत शीतल आली असता तो व्यक्ती आणि मुलगा दोघेही गायब होते. शीतलने तात्काळ पोलीस ठाणे गाठून मुलगा गायब झाल्याची तक्रार देखील दिली तसेच ज्या व्यक्तीकडे सोडले होते त्याचा मोबाईल नंबर देखील पोलिसांना दिला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्या शीतल उघडे हिने ज्या व्यक्तीकडे मुलाला थांबले होते, तो त्या महिलेला प्रियकर असल्याचे पुढे आले. महिलेच्या मोबाईलवरून सतत त्याच नंबरवर फोन होत असल्याचे उघडकीस आल्यावरच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अखेर आईच मुलाची वैरीण ठरल्याची माहिती पुढे आली.

पोलिसांनी बुधवारी (ता.१५) रात्री आदित्य उघडेचा मृतदेह घनसांवगी रस्त्यावरील एका नाल्याच्या जवळून हस्तगत केला असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबून अत्यंत अमानुषपणे या मुलाचा खून केल्याचे उघडकीस आले. प्रियकर नवनाथ जगधने, त्याचा मित्र गणेश रोकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून मुलाची आई असलेली शीतल उघडे हीच महिला मुख्य आरोपी आढळून आल्याने या हत्याकांडाची परिसरात जोरदार चर्चा आहे .


शेअर करा