‘ मी जिवंत आहे ‘ म्हणणारा अठरा वर्षांपूर्वीच मयत, भूताचा अँगल समोर आल्यावर पोलिसही हादरले

शेअर करा

आपण ज्याचा खून केला त्याचे भूत स्वप्नात येऊन आपल्याला त्रास देत आहे, त्यामुळे मला अटक करा असे सांगत छत्तीसगडमधील एक इसम पोलिस ठाण्यात दाखल झाला टीक पोलीराया असे या इसमाचे नाव असून त्याच्या कबुली नंतर पोलिसांनी गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू केला आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, सर्वेश्वर गोयल नावाच्या एका तरुणाची 2003 साली हत्या झाली होती. तपासात काहीच प्रगती होत नसल्याने मृतांच्या नातेवाईकांनी पोलीसांकडे जाणे येणे अखेर सोडून दिले होते, त्यामुळे पोलिसांनी देखील तपासाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे फाईलही बंद करण्यात आली. पण आता मीच हत्या करून मृतदेह खड्ड्यात लपवून ठेवला होता. आता सर्वेश्वर भूत बनून स्वप्नात येऊन मला त्रास देतो,असे टीक पोलीराया याने पोलिसांना सांगितले आहे

माझ्या मैत्रिणीची सर्वेश्वर गोयल हा सातत्याने छेड काढत होता त्यामुळे मी त्याची हत्या केली. हत्येनंतर मी त्याच्या घरी फोन करायचो आणि मीच सर्वेश्वर आहे असे सांगून मी व्यवस्थित आहे काळजी करू नका, असे सांगायचो मात्र पोलिसांनी सुरुवातीला वेगाने तपास केला त्यानंतर मात्र मी गाव सोडून गायब झालो होतो. मात्र आता सर्वेश्वर माझ्या स्वप्नात येऊन मला त्रास देत असल्याने मला अटक करा, असे सांगत हा पोलिस ठाण्यात दाखल झाला.


शेअर करा