पुणे हादरले..अल्पवयीन मुलीला पेरूच्या बागेत नेले , आरोपीचे वय ऐकाल तर ..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. या धक्कादायक घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा पुणे परिसरातील पिंपरी इथे एका 5 वर्षीय चिमुकलीला 67 वर्षीय नराधमाने आपल्या वासनेचा शिकार बनवलं असल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून तिला शेतात घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केला आहे .

उपलब्ध माहितीनुसार , शशिकांत आबासाहेब तापकीर (वय 67) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. नराधम आरोपी गुरुवारी (21 ऑक्टोबर) 5 वर्षीय पीडित मुलीला दुचाकीवर बसवून पेरूच्या बागेत घेऊन गेला होता. याठिकाणी नराधमाने एका गोठ्यात पीडित मुलीला घेऊन जात तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं.

पीडित मुलीच्या आईने 24 ऑक्टोबर रोजी दीघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून दीघी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.त्याने याच पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याचा देखील तपास सुरु आहे .


शेअर करा