पतीला म्हणायची तुला गुप्तरोग तर पतीला तिच्याबद्दल ‘ वेगळाच ‘ संशय , अन एके दिवशी अचानक ..

देशात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून झारखंडमधील धनबादमध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे. महुदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून मयत युवकाचे नाव हे अजय दास असल्याचे समजते. मृत अजयच्या नातेवाईकांनी त्यांच्या सुनेवर खुनाचा आरोप केला असून पत्नी तन्नू कुमारीने कोल्ड्रिंक्समध्ये विष टाकून हत्या केली असे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे.

मृत अजयच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या सुनेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. रात्री उशिरापर्यंत ती कोणाशी तरी लपून बोलायची. अजय ओरडल्यानंतरही संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू, अशी धमकी देखील ती देत होती. सून आणि तिच्या आई-वडिलांनी माझ्या मुलाच्या कोल्ड्रिंक्समध्ये विष टाकून हत्या केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आता प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.

मृत्यूपूर्वी अजय दासने बोकारो येथील बीजीएच रुग्णालयात सेक्टर-4 पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, मिहिर दास यांची मुलगी तन्नू कुमारी हिच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तन्नू कुमारी ही अमलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलगढिया येथील सिरफोर बस्ती येथील रहिवासी आहे मात्र लग्नानंतर पत्नीनं त्याच्यासोबत राहायचं नसल्याचं सांगितलं आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी तिने दिली होती.

मृत अजयच्या नातेवाईकांनी महुदा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून त्याची पत्नी, सासू, सासरे यांना अटक करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी सांगितलं की, पती-पत्नीमध्ये रोज भांडणं व्हायची. पत्नीला पती अजयला गुप्त आजार असल्याचा संशय आला होता तर पती अजयनं पत्नीवर दुसऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावरुन दोघांमध्ये दररोज वाद व्हायचे.