ब्रेकिंग न्यूज : अखेर बिपीन रावत यांच्या मृत्यूची सैन्याकडून पुष्टी , ट्विट करून दिली माहिती

शेअर करा

माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीचाही याच दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं असून याच हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.

कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत आणि अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होते.

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958 मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतल होत .


शेअर करा