पुणे हादरलं..स्वतःच्या आईला मुलाची आणि सुनेची अक्षरश: चपलांनी मारहाण अन त्यानंतर

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे . स्वतःची आई असलेल्या वृद्ध महिलेला चक्क तिच्या मुलाने आणि सुनेने अमानुष मारहाण केल्याची ही संतापजनक घटना बुधवार पेठ इथे घडलेली आहे . वृद्ध आई शांताबाई गजानन पाबळे (वय ८०, रा. बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निळकंठ गजानन पाबळे (वय ६०) आणि मिना निळकंठ पाबळे (वय ५५, रा. बुधवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. आईचा हात या मारहाणीमुळे फ्रॅक्चर झाला असून आरोपींनी चक्क चपलांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मोठा मुलगा असून एका नातवाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असून दुसरा मुलगा सागर याला आपली सासू मारण्याचा प्रयत्न करते असा या सुनेला संशय होता.फिर्यादी या सोमवारी रात्री ८ वाजता घरात खाटेवर झोपल्या असताना त्यांचा मोठा मुलगा निळकंठ व त्यांची पत्नी मिना हे तेथे आले आणि त्यांनी आईला शिवीगाळ करत “तू आमचा मुलगा सागर याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करते” असे म्हणत मारायला सुरुवात केली.

मुलगा निळकंठ याने घेऊन त्याने आपल्या ८० वर्षाच्या आईच्या हातावर आणि अंगावर मारहाण केली तर त्यांची सून मिना हिने चपलेने आईसमान सासूला मारहाण केली. मुलगा आणि सुनेने केलेल्या या मारहाणीत त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. फरासखाना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील अधिक तपास करीत आहेत.


शेअर करा