अंकल..तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही, स्वरा भास्करच्या निशाण्यावर कोण ?

शेअर करा

बॉलीवूडमध्ये सध्याच्या परिस्थितीत दोन विचारधारेचे गट पडलेले आहेत . उजव्या विचारसरणीचे लोक हे कायमच विरोधी विचारांच्या लोकांचा सन्मान करत नाही हे वास्तव आहे मात्र महिलांना देखील त्यांच्याकडून सध्या टार्गेट केले जात आहे . सद्य परिस्थिती अशाच प्रकारचे वाकयुद्ध स्वरा भास्कर आणि निर्माता अशोक पंडित यांच्यात सुरु आहे . बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या स्पष्ट स्वभावामुळे ओळखली जाते मात्र तिला अशोक पंडित यांच्याकडून वारंवार टॅग करून टार्गेट करण्यात येत असल्याने तिने देखील अशोक पंडित यांना चांगलेच सुनावले आहे . अशोक पंडित हे भाजपसमर्थक म्हणून ओळखले जातात मात्र स्वरा भास्करने ट्विटमधून त्यांना परखड शब्दात फटकारले आहे .

आपल्या एका ट्विटमध्ये स्वरा भास्कर म्हणते, ‘”तुमच्या मुलीसोबत काम केलेय, म्हणून तुम्हाला अंकल म्हणत होते. मला ती खूप आवडली. आमच्यात चांगले संबंध तयार झालेत. तुमच्या मुलीमुळे तुम्हाला आदर दिला. पण माझ्यामते, तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही. हा व्यक्तिगत हल्ला नाही. तुम्ही सतत मला टॅग करता. हे वास्तव आहे पण तुम्हाला तर वास्तवाची अ‍ॅलर्जी आहे

https://twitter.com/ReallySwara/status/1263774845721952256

स्वरा भास्कर व अशोक पंडित यांच्यातील ट्विटर वादाची सुरुवात स्वराच्या एका ट्विटनंतर सुरु झाली होती. ‘’तुम्ही दिल्ली वा जवळपासचे मजूर आहात किंवा बिहार वा उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जाणा-या मजूरांबद्दल जाणता तर हा अर्ज भरा. आमचे मित्र या मजूरांची मदत करतील,’ असे एक ट्विट अलीकडे स्वरा भास्करने केले होते. यावर अशोक पंडित यांनी स्वराला लक्ष्य केले होते. ‘तुम्ही स्वत: कागद दाखवण्याला विरोध केला आणि आता स्वत: दुस-यांना मागत आहात. इतक्या लवकर कुणी कसे बदलू शकते? पण ठीक आहे. देर आए दुरूस्त आए,’असे ट्विट करून अशोक पंडित यांनी स्वरा भास्कर हिला डिवचण्याचा प्रयन्त केला होता मात्र या ट्विटला उत्तर देताना स्वराने त्यांना अशोक अंकल संबोधले होते. ‘अशोक अंकल, तुम्ही सतत मला सायबर स्टॉक का करता? तुमच्या वयाला हे शोभत नाही. स्वत:चा आदर करा. मी एनआरसी-एनपीआरसाठी कागद दाखवण्याच्या विरोधात होते. ट्रेनच्या तिकिटासाठी नाही,’ असे तिने लिहिले होते. अशोक अंकल म्हटल्यावर हा बाण अशोक पंडित यांना वर्मी लागला.

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

३१ मे नंतर लॉकडाऊन राहणार कि उठणार, काय म्हणाले उद्धव ठाकरे ? : संपूर्ण व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=111

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103


शेअर करा