मराठी चित्रपटसृष्टी हादरली..’ ह्या ‘ अभिनेत्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असतानाच मराठी चित्रपट सृष्टीतून आणखी एक धक्का देणारी बातमी आली आहे . ‘ खुलता कळी खुलेना’ या मालिकेमधून घरोघरी पोहचलेली मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

आशुतोष भाकरे याने इतके टोकाचे पाऊल का उचलली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या आत्महत्येने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मयुरी देशमुख हिचा पती आणि आशुतोष याने देखील काही मराठी चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. आशुतोष याने काही दिवसांपूर्वी ‘फेसबुक’वर एक व्हिडीओ शेअर केला होता. व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत या व्हिडीओत विश्लेषण करताना दाखवण्यात आलं आहे, मात्र तो इतके टोकाचे पाऊल उचलेल याचा कोणालाही अंदाज नव्हता.

आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. मयुरी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे ‘तिसरे बादशहा हम हे’ नाटक सुरु होते. याशिवाय ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ’31 दिवस’ शिवाय इतर काही चित्रपटात तिने भूमिकाही साकारलेली आहे.


शेअर करा