पुण्यात खळबळ..एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टराने केल्या सगळ्या ‘ मर्यादा ‘ पार

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. पुण्यातील एका डॉक्टरने बीडमध्ये राहणाऱ्या आपल्या वर्गमैत्रिणीच्या नावानं बनावट इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केले आणि तिच्या मैत्रिणीशी बऱ्याच वेळा गप्पा देखील मारल्या मात्र दरम्यानच्या काळात या मैत्रिणीला शंका आली त्यानंतर पीडित युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे इंस्टाग्रामकडे सायबर पोलिसांकडून संपर्क करण्यात आला आणि बनावट खातं तयार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला .

उपलब्ध माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका डॉक्टर युवतीच्या नावाने दीड महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर कोणीतरी बनावट अकाउंट तयार केलं होतं. सदर बनावट अकाऊंटसाठी पीडित युवतीचा फोटो आणि तिच्या नावाचा वापर करण्यात आला होता. सदर प्रकार लक्षात येताच कोणीतरी हा उदयोग करतंय हे लक्षात आल्यावर पीडित डॉक्टर तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली .

पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचेच ठरवले आणि इन्स्टाग्रामशी संपर्क साधून संबंधित अकाउंटबाबत माहिती मागवली असता पुण्यात राहणाऱ्या डॉ. गोपाळ दहिवाळ याने पीडित तरुणीचा फोटो आणि नाव वापरून इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला सायबर सेलमध्ये बोलावून त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्याकडील मोबाइल देखील जप्त केला .

संशयित आरोपी डॉक्टर दहिवाळ आणि फिर्याद दाखल करणारी तरुणी हे वर्गमित्र आहेत. दोघंही बीएचएमएसचं शिक्षण घेताना एकाच वर्गात होते. याच ओळखीतून आरोपी पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता आणि पीडित तरुणीला या प्रकाराची कल्पनाच नव्हती. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून सोडून दिलं असून पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.


शेअर करा