सुजय विखेंवर सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र , म्हणाल्या ‘ खाल्ल्या मिठाला… ‘

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार सुजय विखे यांच्यावर नाव न घेता जोरदार शाब्दिक हल्लाबोल करत आपल्या काँग्रेसमधील दिवसांची आठवण ठेवावी, असा सल्ला दिला आहे.

सुजय विखे पाटलांनी काँग्रेस व यूपीए सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती. सहकाराच्या संदर्भातील कायदे काँग्रेसचे सरकार 35 वर्ष करू शकले नाही. या कायद्यातील बदल मोदी सरकारने केवळ पस्तीस मिनिटात केल्याचा दावा देखील सुजय विखे पाटलांनी केला होता तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी सहकारी साखर कारखाने भंगारात काढले आणि त्यांनी तेच कारखाने पुढे विकत घेतले , असा देखील टोला सुजय विखे यांनी मारला होता.

त्यांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख न करता भाजपच्या तरूण खासदाराचे चांगले भाषण झाले मात्र त्यांनी जुन्या दिवसांची आठवण ठेवावी असा सल्ला दिला. यूपीएचे सरकार असताना तुमचे वडील काँग्रेसमध्येच मंत्री होते त्यामुळे एक प्रकारे तुम्ही आपल्या वडिलांच्या धोरणावर टीका करीत आहात. ही आमची संस्कृती नाही मराठीत खाल्ल्या मीठाला जागावे, अशी म्हण आहे असेही सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.


शेअर करा