मॉलबाहेर वाकलेल्या महिलेच्या छातीचा काढला फोटो, पुण्यात सरपंचाच्या मुलावर गुन्हा

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एका सरपंचाच्या मुलानं आपल्या एका साथीदारासोबत मिळून एका महिलेच्या छातीचा फोटो काढला आणि महिलेने विचारणा केली असता तिला आणि तिच्या पतीला देखील अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शिवम किसन बावकर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्याजवळील मॅकडोनाल्ड समोरील फूड मॉलवर 25 जुलै 2021 रोजी पीडित महिला आपल्या साडेतीन वर्षीय मुलीला केळी खाऊ घालत होती. केळी खाऊ घालण्यासाठी पीडित महिला खाली वाकली असल्याने महिलेच्या छातीचा काही भाग दिसून येत होता.

नेमके याच वेळी फोर्ड गाडीतून पाच जण तिथे आले. त्यामध्ये आरोपी शिवम किसन बावकर याच्यासह ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांचा मुलगा देखील होता. यावेळी आरोपी शिवम यानं संधी साधून पीडित महिलेच्या छातीचा फोटो काढला आणि पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे देखील वर्तन केले. महिलेच्या सोबत असलेले पती यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली .

पती एकटे असल्या कारणाने आरोपींना आणखीनच चेव आला आणि ओझर्डे गावचे सरपंच बाळू पारखी यांचा मुलगा हातात फेव्हर ब्लॉक घेऊन फिर्यादीच्या पतीला मारण्यासाठी अंगावर धावला. या प्रकरणी काल (5 मार्च) शिरगाव-परंदवाडी पोलीस चौकीत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपींना अटक केली नसून घटनेचा तपास केला जात आहे. इतक्या उशीरा ही फिर्याद का देण्यात आली ? याची माहिती मिळू शकलेली नाही.


शेअर करा