बाथरूममध्ये आईचा आरडाओरडा ऐकून मुलगी धावली , समोरील दृश्य पाहून ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना सोलापूर इथे समोर आलेली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अंघोळीसाठी गेलेल्या पत्नीच्या हनुवटीवर आणि पोटावर सुरीने वार करून तिला जखमी करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी पिता पैगंबर याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पैगंबर आणि त्याची पत्नी रशिदा हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून काही महिन्यांपासून आपल्या मुली सोबत राहण्यासाठी सोलापूर येथे राहण्यास आले होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रशिदा या अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेल्या तेव्हा आरोपी पैगंबर हा त्यांच्या पाठोपाठ गेला आणि त्याने तिच्यावर सुरीने वार केले.

रशिदा यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर त्यांची फिर्यादी मुलगी तनुजा यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि मुलीने लगेच बाथरूमचा दरवाजा वाजवला त्यावेळी रशिदा यांना पैगंबर हा ‘ मै आज तुझे जान से मार दुंगा ‘ असे म्हणत होता.

मुलीने आरडाओरडा केल्यानंतर पैगंबर हा दरवाजा उघडून सुरी टाकून पळून गेला. त्या वेळी मुलीने दरवाजा उघडला असताना रशिदा या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या हनुवटीवर आणि पोटावर तसेच पायावर पैगंबर याने वार केले होते. तनुजा यांनी सदर प्रकरणी पैगंबर याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


शेअर करा