गुवाहाटीला ‘ त्या ‘ हॉटेलात आमदारांची मारामारी ? आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की..

शेअर करा

राज्यातील सत्ता संघर्षात रोज नवनवीन बातम्या येत असून अशीच एक बातमी गुवाहाटी हॉटेल येथे आमदारांमध्ये मारहाण झाल्याची आली होती. सदर प्रकरणी राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांसमोर येऊन गुवाहाटी मधील हॉटेलमध्ये कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही हे वृत्त निराधार आणि अफवा आहे असे स्पष्ट केले आहे

एका वृत्तवाहिनीने शिवसेनेचे बंडखोर हे गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये असून रविवारी त्यांच्यामध्ये मारामारी झाली होती अशा आशयाचे वृत्त दिले होते, या वृत्तात प्रकाश आबिटकर यांचा देखील समावेश होता असेही म्हटले होते मात्र आबिटकर यांनी समोर येऊन असा कुठलाही प्रकार घडलेला नाही ही निव्वळ अफवा आहे असे सांगत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.


शेअर करा