गुजरात मॉडेल..प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये तब्बल ‘ इतक्या ‘ किमतीचे हिरोइन सापडले

शेअर करा

केंद्र सरकारकडून देशाची संपत्ती असलेल्या सागरी बंदरांचे देखील खाजगीकरण करण्यात आलेले असल्याने अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ समोर आलेली असून त्यामध्ये एका कंटेनरमध्ये दडून ठेवलेले तब्बल 376 कोटी रुपयांचे 75 किलो हीरोइन एटीएसने मंगळवारी जप्त केलेले आहे.

संयुक्त अरब अमीरात येथून हे हीरोइन पंजाब येथे पाठवण्यात येणार होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुजरातमध्ये या आधी देखील अशा स्वरूपाच्या घटना उघडकीला आलेल्या आहे मात्र गोदी मिडियाने अशा वृत्तांची दखल घेतलेली दिसली नाही. सध्याच्या परिस्थितीत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकणार्‍यांचे रॅकेट असल्याचा संशय असून त्यामध्ये निव्वळ अमलीपदार्थ नव्हे तर बंदी असलेली औषधे तसेच नशेसाठी करण्यात घेण्यात येणाऱ्या गोळ्या यांचादेखील समावेश असण्याची शक्यता आहे.

गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशातून गुप्त पद्धतीने अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती पंजाब पोलिसांना होती त्यानंतर गुजरात एटीएसचे पथक आणि पंजाब पोलीस दलातील उपनिरीक्षक यांची टीम तिथे पोहोचली त्यावेळी 13 मे रोजी आलेल्या एका कंटेनरची झडती घेण्यात आली त्यावेळी तिथे 75 किलो हीरोइन आढळून आले. प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये हिरोइन लपवून त्याला कार्बन टेपने सील केले होते. सध्या मुंद्रा बंदरावर कंटेनरची तपासणी सुरू असून आणखीन अमली पदार्थ देखील सापडण्याची शक्यता आहे.


शेअर करा