.. म्हणून माणसाने देखील माणुसकी सोडली , व्हिडीओ व्हायरल झाला अन..

शेअर करा

एक अत्यंत संतापजनक असा प्रकार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समोर आलेला असून एका कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तीन जणांनी या कुत्र्याला बेदम मारहाण केली आणि आणि त्याला ठार केले अन त्यानंतर ठार झालेल्या या कुत्र्याला दोरीला बांधुन परिसरातून त्याची फरफटत धिंड काढण्यात आली. सदर घटना ही तेलीपुरा चौक टिळक वार्ड येथे घडलेली असून निसर्ग साथी फाउंडेशनने याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

सदर प्रकरणातील आरोपी दीपक गोलू हेडाऊ आणि आशिष हेडाऊ यांच्याविरोधात मुक्या प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा 1960 अंतर्गत कलम अकरा एक ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शहरातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर या संतापजनक प्रकाराला वाचा फुटली आणि अनेक नागरिक याविषयी हळहळ व्यक्त करत होते. निसर्ग साथी फाउंडेशनने फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आणि पोलिसांनी गांभीर्याने तक्रार दाखल करून घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा