भाजपच्या सरपंचाने केला ‘ असा ‘ घोटाळा की बायको आणि वडिलांवर देखील गुन्हा दाखल : नक्की काय केले ?

शेअर करा

भाजपच्या नेत्यांना झालाय काय हे कळत नाही. सत्ता गेली असली तरी गोरगरिबांच्या ताटातले ओढून घेण्याची परंपरा सर्वच नेते पाळत असल्याने लहान मासे देखील गरिबांना का सोडतील ? . पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा गावचा सरपंच आणि शिरूर तालुका भाजप सरपंच आघाडी अध्यक्ष रवींद्र दोरगे याच्यासह त्याची पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र दोरगे याने तळेगाव ढमढेरे इथल्या दीपक आल्हाट व्यक्तीची जमीन विकत घेऊन जमीन खरेदी करताना दिलेले चेक बाउन्स झाले.यानंतर जमिनीच्या मूळ मालकांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि रवींद्र दोरगे याने चक्क ती जमीन पुढे दुसऱ्याला विकून टाकली. मात्र, जमिनीचे मूळ मालकाने टाकळी भिमा इथं जाऊन रवींद्र याच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने जातिवाचक शिवीगाळ केली तसेच जमीनीवर पाय ठेवशील तर परिणाम चांगले होणार नाहीत याची धमकी देखील दिली.रवींद्रचे वडील बाळासाहेब दोरगे आणि पत्नी यांनी देखील जमिनीच्या मूळ मालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याबाबत जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सरपंच रवींद्र दोरगे याच्यासह त्याच्या पत्नी आणि वडिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे रवींद्र दोरगे याच्याविरोधात फसवणुक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. रवींद्र दोरगे वर यापूर्वीदेखील फसवणूक आणि आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अनेक बँकांचे कर्ज घेऊन पुढे हफ्ते न भरणे, बँक अधिकाऱ्यांना कर्जाचा तगादा लावला म्हणून धमक्या देणे असे अनेक प्रकार याआधी देखील सरपंच रवींद्र दोरगे याने केलेले आहे.मात्र वारंवार गुन्हे दाखल होऊन देखील शिक्रापूर पोलिसांना दोरगे याला अटक करण्यात यश आलेले नसल्याने पोलिसांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे का ? हा देखील प्रश्न आहे .

आता तरी पोलीस रवींद्र दोरगे याला अटक करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागलेलं आहे. तर शिरूर तालुक्यातील सरपंचावर फसवणुक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या दोरगे यास अटक करण्याची हिंमत पोलीस दाखवणार का ? याकडे जनता लक्ष ठेवून आहे.


शेअर करा