मोठी अपडेट : नीटचा निकाल अखेर ‘ ह्या ‘ तारखेला , जाणून घ्या सर्व डिटेल्स

शेअर करा

17 जुलै रोजी नीटची परीक्षा झाल्यानंतर ‘ ऑफिशियल ऍनसर की ‘ संदर्भात कोणत्याच स्वरूपाचे अपडेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून देण्यात आलेले नव्हते. अनेक विद्यार्थ्यांनी याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला तसेच दिल्लीतील जंतरमंतर येथे मेणबत्ती आंदोलन देखील केले होते त्यानंतर अखेर नीट परीक्षेत संदर्भात मोठे अपडेट जारी करण्यात आलेले असून 30 ऑगस्ट रोजी ‘ ऑफिशियल ऍनसर की ‘ रिलीज केली जाणार आहे. नीटच्या वेबसाईटवर या संदर्भात अपडेट देण्यात आलेले आहे.

नीट परीक्षेत काही परीक्षा केंद्रांवर हिंदी माध्यमऐवजी इंग्रजी माध्यमातील पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेण्यासंदर्भात देखील सोशल मीडियावर जोरदार मागणी सुरू झाली होती त्यामुळे कदाचित लवकर ‘ ऑफिशियल ऍनसर की ‘ रिलीज केली केली नसेल असा विद्यार्थ्यांचा समज होता.

14 ऑगस्टपासून तर प्रत्येक वेळी तारीख अनऑफिशियल सोर्सेसकडून तारीख रिलीज करण्यात यायची मात्र प्रत्यक्षात नीटच्या वेबसाईटवर काहीच माहिती अपडेट होत नव्हती त्यावर देखील संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर नीटचा निकाल देखील सात सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे असे अपडेट नीटच्या वेबसाईटवर देण्यात आलेले आहे. मेडिकल क्षेत्रात प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी यंदा या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते मात्र सुमारे साडेसोळा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे .


शेअर करा