‘ सनी देओल हरवला आहे ‘ , गुमशुदा कि तलाश है

शेअर करा

देशात निवडणुकांमध्ये नागरिकांसमोर चर्चेतील चेहरा देण्याचे आव्हान राजकीय पक्षांत असते मात्र अनेकदा निवडून आलेले ही व्यक्ती मतदारसंघात फिरकत देखील नाहीत आणि मतदारसंघाला कुणीच वाली राहत नाही असाच काहीसा प्रकार भाजपचे खासदार असलेले सनी देवल यांच्या बाबतीत घडलेला असून पंजाब मधील पठाणकोट जिल्ह्यात संतप्त नागरिकांनी ‘ सनिदेवल हरवला आहे ‘असे पोस्टर लावलेले आहे. सनी देवल यांच्या या पोस्टरची परिसरात जोरदार चर्चा आहे.

सनिदेवल हे पंजाब मधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. भाजपमध्ये जाण्यापूर्वी सनी देवल हे आर्थिक संकटात सापडले होते मात्र त्यानंतर खासदार म्हणून निवडणुकीत निवडून आले अन त्यांचे दिवसच पालटले मात्र त्यांनी पूर्णपणे मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते कधीच लोकांना भेटलेले नाहीत आणि आपल्या मतदारसंघात देखील फिरकले नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण आहे. शहरभर नागरिकांनी आता सनिदेवल हरवला आहे असे पोस्टर लावून आपला संताप व्यक्त केलेला आहे.

संतप्त नागरिकांनी यावेळी सनी देवल यांना प्रश्न विचारताना जर त्यांना कामच करायचे नव्हते तर त्यांनी निवडणूक कशासाठी लढवली ? . त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरुदासपूर येथे आले नाहीत. स्वतःला पंजाबचा सुपुत्र असे ते म्हणतात मात्र त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केला नाही आणि खासदार निधीचे देखील कुठलेच वाटप त्यांनी केलेले नाही. केंद्र सरकारची देखील कोणतीच योजना त्यांनी आणलेली नाही असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.


शेअर करा