मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोदींच्या पावलावर पाऊल , घेतलाय असा निर्णय की ?

शेअर करा

प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यानंतर एक वेगळाच प्रकार राज्यात चर्चेत आलेला असून शिंदे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांच्या काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलेली असून यावर जोरदार टीका देखील होत आहे.

मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून शिंदे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काळे कपडे घालून आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही असे सांगण्यात आले असून चक्क काळा आणि काळा रुमाल देखील घेऊन आले तरी देखील प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले असून ढाल आणि तलवार असे चिन्ह देण्यात आलेले आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून पेटती मशाल हे चिन्ह देण्यात आलेले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून नागरिकांच्या मनात नक्की काय आहे याचे चित्र म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.


शेअर करा