वडील मोबाईल देईनात म्हणून चिठ्ठी लिहून सोडले होते घर…तीन महिन्यांनी ‘ असा ‘ सापडला

शेअर करा

दहावीत असताना वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाने घर सोडले. घरून निघताना मी तुम्हाला विश्वास संपादन करून दाखवेल. तुम्ही माझा शोध घेऊ नका आणि घेतला तरीही मी तुम्हाला सापडणार नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवली मात्र आधार कार्ड नंबर आणि पोलिसांचे तंत्रज्ञान यामुळे तब्बल तीन महिन्यानंतर हा मुलगा सापडला आहे.

धरणगाव तालुक्यातील खेडेगावातील शेतकरी सध्या जळगाव शहरात वास्तव्याला आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा सुखाचा संसार आहे. मुलाने बारावीची परीक्षा दिली आणि अचानकपणे पंधरा जून रोजी घर सोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजले तरी मुलगा वरच्या रूममधून खाली आला नाही म्हणून वडिलांनी मुलीला वर त्याला पाहण्यासाठी पाठवले मात्र मुलगा तिथे आढळला नाही मात्र तिथे एक चिठ्ठी लिहिलेली आढळणारी आढळून आली. त्यात ‘ मी तुम्हाला विश्वास संपादन करून दाखवेल. तुम्ही माझा शोध घेऊ नका. घेतला तरी पण मी तुम्हाला सापडणार नाही ‘ असा उल्लेख होता ती चिठ्ठी वाजताच आई वडील व बहिणीला मोठा धक्काच बसला त्यांनी इतरत्र तपास केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

मुलासोबत मोबाईल नसल्याने देखील मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे वडिलांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिस तपास सुरू झाला. मुलाचा कुठेही तपास लागत नसल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी भाकरी सोडली होती त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावली होती वडील देखील पोलिस चौकीत सारख्या चकरा मारत होते.

अशातच तीन दिवसापूर्वी मुलाच्या नावाचा स्टेट बँकेचा कागदाला कागद घरी आला . मुलगा तर घरी नाही त्याशिवाय त्याचे बँकेत खाते ही नाही त्यामुळे हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मुलाचे वडील ते पाकीट घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचले . या पाकिटावर असलेल्या माहितीवरून पोलिसांनी बँकेशी संपर्क केला आणि बँकेकडून आधार कार्ड क्रमांक तसेच त्याला कनेक्ट असलेला मोबाईल क्रमांक मिळवला

मोबाईल क्रमांकाच्या आधारावर कर्नाटकातील मेंगलोर इथे हा क्रमांक वापरत असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर जिल्हापेठचे निरीक्षक अकबर पटेल यांनी अजित पाटील, योगेश ठाकूर हे दोन कर्मचारी तसेच मुलाचे वडील यांना सोबत घेऊन मेंगलोर गाठले . हा मुलगा ज्या मुलाच्या सतत संपर्कात होता त्यालाच पोलिसांनी हेरले आणि त्याच्या माध्यमातून थेट मुलालाच शोधले. समोर वडिलांना पाहताच मुलगा देखील चकित झाला.

पोलीस काही काम करत नाहीत यासह पोलिसांविषयी मी अनेक तक्रारी ऐकल्या होत्या मात्र माझा मुलगा आज पोलिसांमुळे सापडला आहे. माझी मानसिकता पाहता पोलिसांनी गेले तीन महिने काय मेहनत घेतली हे माझे मलाच माहीत. कधी कधी तर या मुलाचे पालक आपण आहोत की पोलीस हेच सुद्धा कळत नव्हते जळगाव पोलीस पोलिसांचे उपकार आपण कधीच विसरणार नाही. अनेक वेळा पोलीस कर्मचाऱ्यांना भेटलो पण त्यांनी कधीच माझा कंटाळा केला नाही. अशी प्रतिक्रिया मुलाच्या पालकांनी दिली आहे

मेंगलोर गाठून जनतेला कमी दरात जेवण पुरवणाऱ्या संस्थेत ह्या मुलाने नोकरी मिळवली होती तिथे त्याला दहा हजार रुपये पगार राहणे व जेवणाची व्यवस्था होती मात्र वेतन हे हातात न देता ऑनलाइन बँकेत जमा केले जात असल्याने त्याला बँक खाते उघडण्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी त्याने आधार कार्ड बँक अकाउंटला जोडले होते. बँकेचे थेट पत्र घरी आल्याने यातूनच पोलिसांना धागा सापडला आणि वाट चुकलेल्या या मुलाला घरी पोचवण्यात पोलिसांना यश आले .


शेअर करा