अंत्यसंस्कार होत असतानाच पापणीची उघडझाप झाल्याचे जाणवलं अन ..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीच्या मृत्यूची जोरदार चर्चा सुरू असून वर्धा येथील ही प्रकरण आहे. कारंजा तालुक्यातील पालोरा येथे एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी नागपूरला नेण्याचा त्यांना सल्ला दिला आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीला मयत घोषित केले . अंत्यसंस्काराच्या वेळी काही जणांना या व्यक्तीची पापणी हलली असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पुन्हा कारंजा येथील रुग्णालयात या व्यक्तीला घेऊन जाण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना पुन्हा मयत घोषित केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिलीप रामोजी ढोले ( वय 64 राहणार पालोरा ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांची प्रकृती खालावल्याने 21 फेब्रुवारी रोजी त्यांना रात्री दोनच्या सुमारास कारंजा येथील एका रुग्णालयात नेण्यात आलेले होते. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला आणि नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना मयत घोषित करण्यात आले.

मयत घोषित करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह पालोरा येथे परत आणण्यात आला आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले तसेच त्यांचे अंग गरम असल्याचा देखील दावा त्यांच्या बहिणीने केला त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र तेथे देखील त्यांना मयत घोषित करण्यात आले आणि अंत्यसंस्कार पार पडले.


शेअर करा