वाघाच्या मावशीनं रेस्क्यू पथकाला असं भन्नाट गंडवल की .. : पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून एका पोलवर अडकलेल्या मनीमाऊचा हा व्हिडिओ आहे. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या एका पोलवर वरच्या टोकाला जाऊन ही मनीमाऊ बसली आणि त्यानंतर तिथे तिला उतरताच येईना म्हणून शंका आल्याने तात्काळ रेस्क्यू पथकाला तिथे बोलावण्यात आले. रेस्क्यू पथकाने तिथे पोहोचल्यानंतर तिला वाचवण्यासाठी म्हणून शिडीची हाईट वाढवली आणि तिच्या उंचीपर्यंत पोहोचले त्यानंतर तिला आपल्याकडे येण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्या बाजूने एक लाकडी बांबू नेला मात्र मनीमाऊ काही त्यावर बसली नाही ..

बांबूवर बसण्यास घाबरत असेल या कारणाने पथकातील व्यक्तीने अखेर एक त्याच्यासोबत असलेली एक झोळी मनीमाऊपुढे केली आणि त्यानंतर मात्र जे घडले ते त्यालादेखील चक्रावून टाकणारे होते. रेस्क्यू पथकाच्या माणसाला पाहिल्यानंतर ही मनीमाऊ चक्क ज्या पोलवर चढली होती त्याच पोलवरून सरसर करत खारुताईसारखी उतरून निघून गेली आणि पथकातील व्यक्ती हे पाहतच राहिला. पेटस्टोरी नावाच्या एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केलेला असून या करामती मनीमाऊने रेस्क्यू पथकाचे चांगलेच हसे केलेले आहे


शेअर करा