दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायची ‘ तिला ‘ घाई मात्र पहिल्या पतीचे अपत्य ठरत होते अडचणीचे : तिने काय केले ?

शेअर करा

पहिल्या पतीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षे चिमुकल्याला आईने माहेरच्या मंडळीच्या मदतीने विष पाजले यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 26 जुलै 2019 रोजी नांदेड येथील हिमायत्नगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली. या प्रकरणात तब्बल 14 महिन्यानंतर आईसह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हिमायत्नगर तालुक्यातील बोरगाव येथील अशोक भोजराव तवर यांचा मुलगा संदीप तवर याचा विवाह खडकी येथील कांताबाई यांच्याशी झाला होता परंतु या विवाहाला कांताबाई हिची नापसंती होती. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच खटके उडत असत. पुढे या दोघांना 28 मार्च 2013 रोजी मुलगा झाला त्याचे नाव नमन उर्फ शिवप्रसाद असे ठेवण्यात आले.

दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर कांताबाई हिने हिमायत्नगर न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला आणि त्यानुसार तिला पोटगी देखील मंजूर झाली. संदीप तवर यांनी न्यायालयाला शिवप्रसाद या मुलाचा ताबा मागितला होता परंतु तो लहान असल्याने आईकडेच त्याचा ताबा देण्यात आला.

पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर कांताबाई हिने दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी केली त्यामुळे पहिल्या पतीपासून असलेला तीन वर्षाचा मुलगा हा तिचे दुसरे लग्न जमण्यात अडथळा ठरत होता त्यामुळे कांताबाई हिने 23 जुलै 2019 रोजी माहेरच्या मंडळीच्या मदतीने त्याला विष पाजले. नांदेडला त्याचा 26 जुलै २०१९ रोजी मृत्यू झाला.

या प्रकरणात चौदा महिन्यानंतर शिवप्रसादचे आजोबा अशोक तवर यांनी हिमायतनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवप्रसादची आई कांताबाई संदीप तवर, सुनंदाबाई दत्तराव सूर्यवंशी, दत्तराव देवराव सूर्यवंशी, देवराव सूर्यभान सूर्यवंशी आणि आणि ममता दत्तराव सूर्यवंशी सर्वजण राहणार खडकी बाजार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे


शेअर करा