बायकोबरोबर भांडण झाले म्हणून ‘ चक्क ‘ तोंडात केला जिलेटीनचा स्फोट : कुठे घडली घटना ?

शेअर करा

संसार म्हटलं की नवरा-बायकोमध्ये भांडणेही आली मात्र याच भांडणाचा अतिरेक झाल्याने एका पतीने चक्क दारूच्या नशेत जिलेटिनची कांडी तोंडात धरून त्याचा स्फोट केला आणि आत्महत्या केली. हा स्फोट इतका भयानक होता की पतीचे शिर धडावेगळे झाले. सुखदेव किसन मधे ( वय ४६ राहणार येलखोपवाडी अकलापूर तालुका संगमनेर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील अकलापुर गावात मंगळवारी ही घटना घडली

सुखदेव यास दारूचे व्यसन होते व त्यावरून पत्नी आणि कुटुंबियांमध्ये त्यांची कायमच भांडणे होत असत. मंगळवारी रात्री सुखदेव दारू पिऊन घरी आला. मुलाने जेवणासाठी बोलावले असता त्याने जेवण करण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी मुलाने मध्यस्ती केली त्यानंतर रागाच्या भरात सुखदेव यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला.

थोड्यावेळाने खोलीतून स्फोटाचा आवाज आला. कुटुंबीय घटनास्थळी गेल्यावर त्यांना सुखदेव त्याचे शीर धडावेगळे झाल्याचे दिसले. जिलेटिनची कांडी तोंडात धरून खोलीतील प्लगमध्ये वायर घालून त्याने स्फोट केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास भुसारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शिर्डी येथील बॉम्बशोधक पथक पाचारण करण्यात आले होते. अनिकेत मधे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे


शेअर करा