पेट्रोल पंपावरील लुटपाट केवळ दिशाभूल करण्यासाठी , मालकाचा सुपारी देऊन खून

शेअर करा

असे म्हटले जाते की मुलीची सर्वाधिक माया ही तिच्या वडिलांवर असते आणि वडिलांची देखील सर्वाधिक माया ही मुलीवर असते मात्र नागपूर इथे एक असे प्रकरण समोर आलेले आहे की ज्यावर विश्वास ठेवणे पोलिसांना देखील अवघड झालेले होते. सुरुवातीला लुटपाटीसाठी म्हणून करण्यात आलेला प्रकार हा अखेर मुलीने सुपारी देऊन बापाचा खून केला असल्याची घटना समोर आलेली आहे. सराईत गुन्हेगारांनी अवघ्या 19 सेकंदात 29 वार करत या मुलीच्या वडिलांची हत्या केलेली आहे . नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील हे प्रकरण आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिलीप सोनटक्के ( वय साठ वर्ष ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून ते नियमितपणे त्यांच्या मालकीचा असलेला भिवापूर येथील पेट्रोल पंप इथे हिशोब करण्यासाठी बसलेले होते त्यावेळी दुचाकीवरून तीन जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी दिलीप सोनटक्के यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यानंतर ते फरार झाले. जाताना त्यांनी तिथून एक लाख 38 हजार रुपये देखील नेले होते त्यामुळे सुरुवातीला दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती मात्र तपासात भलतीच माहिती समोर आलेली आहे.

दिलीप सोनटक्के यांचे वय 60 वर्ष असून त्यांना पत्नी आणि मोठी मुलगी आणि मुलगा असे कुटुंबीय आहे. गेल्या काही वर्षांपासून दिलीप सोनटक्के हे कुटुंबाला सातत्याने त्रास देत होते आणि अखेर या वादातून घर देखील सोडलेले होते. दिलीप सोनटक्के यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि ते गेल्या वर्षभरापासून एका महिलेसोबत वेगळे राहत होते. आपले वडील पूर्णपणे या महिलेच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे दिलीप सोनटक्के यांची संपत्ती ही महिला गिळंकृत करेल आणि आपल्या मुलांना देण्यासाठी काहीच राहणार नाही असा कुटुंबीयांच्या मनात राग होता त्यातून दिलीप सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीने वडिलांच्या हत्येची पाच लाख रुपयांची सुपारी आरोपींना दिलेली होती.

दिलीप सोनटक्के यांची मोठी मुलगी विवाहित असून ती दिव्यांग आहे. सुरुवातीला पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली त्यावेळी ती असे काही करेल अशी शंका देखील पोलिसांना आली नाही मात्र नागपूर ग्रामीण पोलीस दलातील आयपीएस अधिकारी अनिल मस्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर या मुलीची विचारपूस करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिने हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिलेली आहे . पोलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून मुलगी प्रिया तर हत्येची सुपारी घेतलेल्या तीन जणांना ताब्यात घेतलेले आहे.


शेअर करा