कोंबडी खाद्य असल्याचे सांगून गाडीला अत्यावश्यक सेवेचा पास मात्र गाडीत आढळले ‘ भलतेच ‘ ?

शेअर करा

कोंबडी खाद्य घेऊन जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेचा पास वाहनाला लावून कर्नाटकातून पुण्याकडे एक गाडी पोलिसांनी धरली असताना गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाला पंढरपूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले. या कारवाईत 35 लाख १७ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पंढरपुरातून लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची कुणकुण पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना मिळाली. त्यांनी हा गुटका पकडण्यासाठी पथकास सांगितले. शुक्रवारी रात्री सरगम चौकात या संशयित वाहनास आडवले असता चालकाने त्यात कोंबडीचे खाद्य असल्याचे चालकाने सांगितले मात्र पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटका असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी सदर प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन यास खबर दिली. त्यानंतर अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर हे घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी मुद्देमाल तपासला. सदर मुद्देमाल हा गुटका असल्याचे आढळून आल्यानंतर सागर महाजन ( वय 23 राहणार नागझरवाडी तालुका कळंब ) रवींद्र देवरे ( वय 39 राहणार आळंद मातोबा ) या वाहनचालकांसह योगेश काळभोर ( राहणार लोणी काळभोर ) , विष्णू प्रजापत व निलेश काळभोर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे. वाहन चालक सागर महाजन आणि रवींद्र देवरे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे


शेअर करा