सर्वात मोठं सेक्स स्कँडल उघडकीस , 5500 पेक्षा जास्त क्लिप्स सापडल्या

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानमधील इस्लामिया विद्यापीठातील एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून तब्बल 5500 पेक्षा अधिक विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले आहे . स्कँडलचा सूत्रधार हा पाकिस्तानच्या माजी केंद्रीय मंत्र्याचा मुलगा असल्याची देखील माहिती असून शहबाज शरीफ यांच्या कॅबिनेटमधील मंत्री असलेले चौधरी चिमा यांच्या मुलाने विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना अमली पदार्थ देऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ काढल्याची चर्चा आहे.

पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली असून आत्तापर्यंत पाच हजार पाचशे अश्लील व्हिडिओ क्लिप जप्त केलेल्या आहेत . इस्लामिया विद्यापीठाचा सुरक्षा प्रमुख असलेला मेजर इजाज शाह याचा देखील यात सहभाग असून चिमा यांनी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत मदत मागितलेली आहे अशी ही चर्चा प्रसार माध्यमात आहे.

चौधरी चिमा यांच्या मुलाचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे तपासात समोर येऊ नये म्हणून याचाच शाह याच्या अटकेची आणि त्यांच्याकडून व्हिडिओ जप्त करण्याची मागणी चिमा यांनी केलेली असून पोलिसांनी या आधीच इजाज शाह याला अटक केलेली आहे. त्याच्याकडे अनेक लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या आणि काही औषधे देखील सापडलेली आहेत

इजाज शाह याचा फोन पोलिसांनी तपासला त्यावेळी त्याने काही तरुण तरुणींना चक्क अमली पदार्थ विकल्याची माहिती समोर आलेली असून विद्यापीठात शिकणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासात समोर आलेली आहे. इजाज याच्याकडे सुरक्षेच्या कारणास्तव म्हणून कॅमेऱ्याचा एक्सेस होता त्यातून तो विद्यार्थिनींवर नजर ठेवत असायचा. विद्यार्थी प्रियकरांची गळाभेट घेणाऱ्या तसेच झाडाखाली बसलेल्या विद्यापीठाच्या इमारतीजवळ मित्रांसोबत धूम्रपान करणाऱ्या तरुणींचे फुटेज इजाज मिळवायचा आणि त्या त्याच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करत असायचा असे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेले आहे.


शेअर करा