आणखीन एक ज्योती मौर्या , नोकरी मिळताच अल्पवयीन प्रियकर निवडला

शेअर करा

काही दिवसांपूर्वी ज्योती मौर्य आणि अलोक मौर्य या पती पत्नीतील वाद चांगलाच चर्चेत आलेला होता त्यानंतर सीमा हैदर प्रकरण आले त्यानंतर अंजू थॉमस प्रकरण आले आणि हे प्रकरण काहीसे बाजूला पडले मात्र आणखीन एक प्रकरण समोर आलेले असून सोशल मीडियात या प्रकरणाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यातील अरुण नावाच्या एका व्यक्तीने अत्यंत खराब परिस्थितीत पत्नी आणि मुलांचे पालनपोषण केले. अंगणवाडीत सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली आणि पत्नीच्या वागण्यात बदल झाला आणि अखेर ती त्याला सोडून पळून गेली असल्याचा आरोप पतीने केलेला आहे. अरुण याची पत्नी त्याला आणि दोन मुलांना सोडून गावातील एका उनाड मुलासोबत पळून गेलेले असून अरुणने आता पोलीस आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे बायको आणि तिच्या प्रियकराला शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे.

अरुण याने मजुरी करून घर सांभाळले आणि पत्नीला शिक्षणासाठी नोकरीसाठी प्रोत्साहन दिले. 2016 साली तिची अंगणवाडीतील सहाय्यक पदी नियुक्ती झालेली होती. 21 जुलै 2023 रोजी त्याची बायको कामावर जाते असे म्हणून घरातून निघाली आणि परत आलीच नाही पतीने शोध घेतला त्यावेळी ती परिसरातील एका उनाड मुलासोबत राहत असल्याचे लक्षात आले. पतीने तिला घरी येण्याची विनंती केली मात्र तिने याला नकार दिला. मला तू पण नको आणि तुझे मुले पण नको अशी देखील ती म्हणाली. धक्कादायक बाब म्हणजे ती ज्या मुलासोबत राहत आहे तो अल्पवयीन आहे असे देखील अरुण यांचे म्हणणे आहे.


शेअर करा