पंकजा मुंढे यांनी मनावर दगड ठेवून घेतला ‘ हा ‘ निर्णय .. काय केले कार्यकर्त्यांना आवाहन ?

शेअर करा

आपले बंधू धनंजय मुंढे यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंकजा मुंढे भाजपमध्ये एकाकी पडल्याचे चित्र आहे . अशातच पंकजा मुंढे यांना विधानपरिषदेला देखील भाजपने उमेदवारी नाकारली. अशा पार्श्वभूमीवर ३ जूनला स्व . गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असल्याने गोपीनाथ गडावर पंकजा मुंढे काय बोलणार ? याचे त्यांच्या समर्थकांना आकर्षण होते मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम अत्यंत सध्या पद्दतीने होणार असल्याचे पंकजा मुंढे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून दरवर्षी लाखो कार्यकर्ते गोपीनाथ गडावर एकत्र येतात. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंसह संपूर्ण मुंडे कुटुंबाची हजेरी असते. तसेच, पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतात. मात्र, देशातील, राज्यातील कोरोनाची अन् लॉकडाऊनची परिस्थिती पाहता यंदाचा पुण्यतिथी कार्यक्रम अतिशय साधेपणाने करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सांगितले. तसेच, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंढे यांनी काय म्हटले आहे फेसबुक पोस्टद्वारे ? : पोस्ट सुरु

काल बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली पण #Lockdown होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. कारण मी जरी लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, त्याठिकाणी स्थानिक व इतर जिल्हयातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल, नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे #covid19 च्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा. लोक माझं अनुकरण करतील मी घरी राहिले तर घरी थांबतील पण मी निघाले तर अश्या स्थितीत प्रश्न निर्माण होईल.

मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खा. प्रीतम ताई ह्या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन #Live करतील. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, जे मला फोन करत आहेत ताई, तुम्ही कधी निघताय, कधी निघताय.. पनवेल, नवी मुंबई, पुणे, शिक्रापूर, नगर, जामखेड, पाथर्डी, आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड सगळीकडचे लोक आम्ही निघतोय असे म्हणत आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी मी जशी आपल्याला सूचना केली आहे, त्याप्रमाणे घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया.. मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता. एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करण्यासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी.

–पोस्ट समाप्त —

संबंधित बातम्या

‘ त्या ‘ दिवशी ते व्हिडीओ व्हायरल होतील, हर्षवर्धन जाधव यांचा रावसाहेब दानवे यांना इशारा : पहा व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=221

देशाचे नाव बदलून ‘ हे ‘ ठेवा नाव ,सर्वोच्च न्यायालयात २ जूनला सुनावणी : सविस्तर बातमी
https://nagarchaufer.com/?p=224

अमित शाह यांना ‘ आत्मनिर्भर ‘ म्हणताच येईना.. सत्यजित तांबे यांनी केला व्हिडीओ शेअर : पहा व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=242

महाराष्ट्र सरकारची देखील नवीन नियमावली जाहीर .. पहा काय सुरु काय बंद ?
https://nagarchaufer.com/?p=246

महत्वाची बातमी .. पेट्रोल डिझेल आणि गॅसमध्ये आजपासून भाववाढ, काय आहेत नवीन दर ?
https://nagarchaufer.com/?p=255


शेअर करा