श्रीरामपूर खून प्रकरणात दोन जण ताब्यात , शाहरुखसोबत वाद झाला अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना श्रीरामपूर शहरात समोर आलेली असून संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ बुधवारी झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दोन संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. तरुणाच्या डोक्यात फरशीचे घाव करत त्याचा खून करण्यात आलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , शाहरुख उस्मान शहा ( वय 28 बीफ मार्केट श्रीरामपूर ) असे मयत तरुणाचे नाव असून संगमनेर रस्त्यावर तो काही व्यक्तींसोबत बसलेला असताना वाद झाला आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशीने घाव करण्यात आला. साखर कामगार रुग्णालयात त्याला नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्री फिरवत दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. दोन्ही आरोपी हे शाहरुख याच्या ओळखीचे असून मयत असलेला शाहरुख याच्यावर देखील मालमत्तेची चोरी तसेच हाणामारीचे गुन्हे याआधी दाखल झालेले आहेत. सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती आहे.


शेअर करा