म्हशीच्या पोटात आढळली घरातली ‘ गायब वस्तू ‘, शेतकऱ्याचा अंदाज खरा ठरला

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब अशी घटना सध्या समोर आलेली असून एका पाळीव म्हशीने वाशिम इथे चक्क अडीच तोळ्याची सोन्याची पोत गिळून टाकली होती. एक शेतकरी महिला तिला चारा खाऊ घालत होती त्यावेळी महिलेची पोत सटकली आणि ती चाऱ्यात पडली म्हशीने ती गिळून टाकली त्यानंतर म्हशीवर शस्त्रक्रिया करून ही पोत बाहेर काढण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , वाशिमच्या सारशी भोयर या गावातील शेतकरी रामकृष्ण भोयर यांच्या कुटुंबीयांचे सोयाबीनच्या शेंगामधून दाणे काढण्याचे काम सुरू होते त्यावेळी बायकोच्या गळ्यातली सोन्याची पोत सोयाबीनच्या टरफलात पडली आणि ती तशीच टरफलासोबत म्हशीच्या पोटात गेली. घरात सोन्याची पोत सापडेना म्हणून पूर्ण घर शोधून काढण्यात आले मात्र पोत काही मिळाली नाही.

सोयाबीनच्या टरफलात पोत गेली असल्याची शंका आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घेण्यात आला आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात म्हशीवर पूर्णपणे मोफत सर्जरी करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्याचा देखील खर्च वाचला. शेतकऱ्याचा अंदाज खरा ठरला आणि म्हशीच्या पोटात ही पोत आढळून आली . म्हशीच्या पोटात सोन्याच्या पोतीसोबत दोन-तीन खिळे देखील गेलेले होते ते देखील काढून टाकण्यात आले आहेत.


शेअर करा