आयेशाची झाली ‘ अक्षता ‘ , बजरंग दलाच्या कार्यकर्त्याशी पळून जाऊन विवाह

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून बजरंग दल कार्यकर्ता आणि एक मुस्लिम तरुणी यांच्यात हा विवाह पार पडलेला आहे. मंगळूर इथे एका मुस्लिम महिलेने चक्क बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत विवाह केलेला आहे. तिने धर्मांतर केलेले असून त्यानंतर स्वतःचे नाव देखील बदललेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेले प्रशांत भंडारी यांनी त्यांच्याच परिसरात राहत असलेल्या आयेशा नावाच्या एका स्थानिक तरुणीशी विवाह केलेला आहे . गेल्या तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते मात्र दोन्ही घरच्या मंडळींचा त्यांना विरोध होता अखेर त्यांनी कुटुंबियांच्या मर्जीच्या विरोधात एका मंदिरात लग्न केलेले आहे. आयेशा हिने तिचे नाव आता अक्षता केलेले असून नवभारत टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलेले आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ही घटना आहे.

प्रशांत भंडारी यांनी या प्रकरणी माध्यमांना माहिती देताना , ‘ मी आयशासोबत लग्न करण्यासाठी आईकडे परवानगी मागितलेली होती मात्र त्यासाठी त्यांची संमती नव्हती. आयेशाचे कुटुंबीय देखील या लग्नाला विरोध करत होते त्यामुळे कुटुंबीयांच्या मर्जीच्या विरोधात लग्न करण्याखेरीज आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता , ‘ असे म्हटलेले आहे.

30 नोव्हेंबर रोजी प्रशांत आणि आयेशा हे घरातून गायब झालेले होते . आयेशा हिच्या वडिलांनी यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आणि 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेल्या या दोघांचे विवाहाचे फोटो आठ डिसेंबर रोजी समोर आले . आयेशा घरातून बाहेर पडली मात्र त्यानंतर तिने पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न केलेले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेले आहेत .


शेअर करा