‘ स्त्री ‘ म्हणून आरामदायक वाटेना , लिंगबदल करून ‘ आस्था ‘ सोबत लग्न..

शेअर करा

देशात सध्या एक एका जोडप्याची जोरदार चर्चा सुरू असून स्त्री म्हणून जन्मलेल्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीने लिंग बदलून त्यानंतर बहिणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केलेले आहे . प्रशासनाकडून त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अस्तित्व ( वय 50 ) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी आस्था नावाच्या महिलेसोबत विवाह नोंदणी प्रक्रिया दरम्यान अर्ज केलेला होता . दोन्ही कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला कुठलाही विरोध झाला नाही किंवा त्या विरोधात कोणी आक्षेपही नोंदवला नाही त्यामुळे त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

अस्तित्व आणि आस्था यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले असून एका छायाचित्रात लग्नानंतर घरी पोहोचलेल्या वधू-वरांचे कुटुंबीय आरती करताना तसेच ढोल ताशाच्या गजरात स्वागत करताना दिसून येत आहेत. अस्तित्व हा व्यवसायाने प्रॉपर्टी व्यावसायिक आहे . 47 व्या वाढदिवसाआधी स्त्री असलेल्या व्यक्तीने पुरुष म्हणून शस्त्रक्रिया केली . स्त्री म्हणून आपल्याला आरामदायक वाटत नव्हते असे सांगत आपले आधीचे नाव अलका होते असे म्हटलेले आहे.

अस्तित्वने या प्रकरणी अधिक बोलताना , ‘ माझ्या लाईफ पार्टनरचे खरे नाव रितू आहे मात्र प्रेमाने मी तिला आस्था असे नाव दिलेले आहे मला सुरुवातीपासून आस्था नावाच्या पात्राबद्दल कुतूहल होते . मी ठरवले होते की जेव्हा मी लग्न करेल तेव्हा पत्नीचे नाव आस्था ठेवेल. आस्था हिला माझा आयुष्यातील जोडीदार म्हणून पाहताना मला जो काही आनंद झालेला आहे तो शब्दात व्यक्त करता येणार नाही ‘, असे देखील त्याने म्हटलेले आहे.


शेअर करा