‘ सना ‘ ची झाली सरिता , योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची याचना

शेअर करा

देशात सध्या एका आंतरधर्मीय प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील प्रतापगड माणिकपूर येथील हे प्रकरण आहे. एका प्रेमीयुगोलाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन गुपचूप लग्न केले प्रेयसीने त्यानंतर धर्म परिवर्तन करून कोर्ट मॅरेजही केले आणि सहा महिने पती-पत्नी म्हणून ते दिल्लीला राहिले मात्र इतर धर्मातला पती निवडल्यानंतर मुलीचे कुटुंबीय अद्यापही हे लग्न मान्य करायला तयार नाहीत म्हणून हतबल झालेल्या विवाहित महिलेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची रचना केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, सना असे या विवाहित महिलेचे नाव असून तिचा प्रियकर असलेला दिनेश हा इतर धर्मीय असल्याकारणाने त्यांना लग्न करण्यास अडचणी येत होत्या . सना हीने त्यानंतर स्वतःचा धर्म बदलला आणि दिनेश यांच्या सोबत कोर्ट मॅरेज केले.  दिनेशच्या कुटुंबीयांनी सनाला सून म्हणून स्वीकारले मात्र सनाचे कुटुंबीय अद्यापही दिनेशला जावई मानण्यास तयार नाहीत. 

दिनेश निर्मल आणि सना परवीन असे या दांपत्याचे नाव असून त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागताच सना हिच्या कुटुंबीयांनी दिनेश याला मारहाण केलेली होती मात्र कोणीही माघार घेतली नाही त्यानंतर आणि त्यांच्या प्रेमात फरक देखील पडला नाही त्यानंतर स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी लग्न केले आणि सनाने लग्नानंतर आपले नाव सरिता असे ठेवले. 

लग्न केल्यानंतर उत्तर प्रदेशात राहणे अवघड आहे याची जाणीव होताच ते दिल्ली येथे गेले मात्र त्यानंतर त्यांनी गावाकडे न येण्याचा निर्णय घेतलेला आहे . आपण गावाकडे आलो तर आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे असून सनाने यासंदर्भात एक व्हिडिओ बनवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची धाव मदतीसाठी धाव घेतलेली आहे . सना हिच्या आईने आपल्या मुलीशी आपला कसलाही संबंध नाही तिच्या लग्नाबद्दल आम्हाला कसला आक्षेपही नाही असे म्हटलेले आहे.


शेअर करा